आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखर्च होत आहे व्यर्थ असा पालिकेचा कारभार असल्याचे दिसून येत आहे. विविध साहित्य खरेदी फक्त नावापुरतीच झालेली असतानाच आता बाजारालाही प्रवेशद्वार लाऊन पालिकेने हा खर्चही व्यर्थच केल्याचे दिसून येते. लोखंडी गेट काही बाजूने बसवले असले तरी बाजारात जाण्याचे अनेक मार्ग मात्र उघडेच ठेवले आहेत. चोरीस जावी अशी मालमत्ता बाजारात नाही. भाजी बाजार असल्याने फक्त कांदे, बटाटे, आले, लसून असा माल तोही कुलूपबंद असतानाही जिल्ह्यात फक्त बुलडाण्यातच भाजी बाजाराला लोखंडी गेट उभे करून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र जुना मार्ग अडचणीचा ठरत असताना व दुसऱ्या भाजी बाजाराची गरज असताना त्याची मात्र निर्मिती होत नाही.
शहराचा विस्तार झाला असताना आठवडे बाजार तेवढाच राहिला आहे. यामुळे भाजी बाजार आता बाहेरच अधिक भरत आहे. असे असताना भाजी बाजाराला लोखंडी प्रवेशद्वार लावण्याचे कार्य नगर पालिकेने करुन लोकांच्या कराचा पैसा व्यर्थ गमावण्याचे काम सुरुच ठेवले आहे. विस्तारलेल्या बुलडाण्यात भाजी विक्रेते जीव मुठीत घेऊन सर्क्युलर रोडवर भाजी विकतात तर नागरिकही जीव मुठीत धरुन भाजी विकत घेण्यास जातात.
असे आहे लोखंडी द्वार
मुख्य रस्त्याकडून बाजारात जाताना दोन्ही बाजूने लोखंडी द्वार बसवण्यात आले आहे. मात्र हनुमान मंदिराच्या बाजूने मेडिकलला लागून रस्ता आहे. तो तसाच उघडा आहे. आठवडी बाजारात दुसरा रस्ता गवळीपुऱ्याच्या बाजूने आहे. इक्बाल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याकडूनही दोन लोखंडी द्वारे लावण्यात आली आहेत. मात्र मांस विक्री होणारी बाजू व त्याच रस्त्याने पुढे मशिदीच्या मागे जाणारी बाजू उघडीच आहे. प्रवेशद्वार बांधल्यानंतर बाजारात कोणी जाणारच नाही, असे म्हणता येणार नाही.
जे पैसे देतात त्यांचे काय
बुलडाणा शहरात रस्त्यावर दुकाने लावणारे, फेरीवाले यांच्याकडून पालिका बैठक पावती फाडते. या पावतीवर पालिकेला महसूल प्राप्त होतो. दररोज शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी शहरात येतात. रात्री उशिरापर्यंत हे शेतकरी व भाजी विक्रेते रस्त्यावर आपला माल विकतात. त्यांना असे संरक्षण पावती फाडूनही नगर पालिका का देत नाही. असाही प्रश्न चर्चेचा ठरत आहे.
जनावरांपासून संरक्षण नाही
लोखंडी प्रवेशद्वार बांधला त्याचा फायदा रात्री होईल, असे पालिकेला वाटत आहे. मात्र दिवसाच ज्या मोकाट जनावरांचा भाजी विक्रेत्यांना त्रास आहे. त्यापासून विक्रेत्यांना संरक्षण का मिळत नाही. ज्यात मांसाहाराचे तुकडे, मच्छीचा वास, कोंबड्यांची पिसे येऊन पडतात. त्यापासून कोणते संरक्षण पालिका देत आहे. मग हे प्रवेशद्वार काय कामाचे आहे. बाजारात येणाऱ्या शहरवासीयांना या बाबीचा त्रास होत आहे. त्यामुळेच अधिकतम लोक रस्त्यावरच भाजीपाला खरेदी करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.