आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:गणेशोत्सव काळात आपल्या गावची शांतता आपणच राखली पाहिजे ; शांतता समितीची बैठक

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यावर्षी निर्बंधमुक्त सण, उत्सव साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. सण, उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपल्या गावची शांतता आपणच राखली पाहिजे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी केले.

गणेशोत्सव, नवदुर्गा, जगदंबा या धार्मिक सण, उत्सवाच्या अनुषंगाने जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी जलंब पोलिस ठाण्यात ३ सप्टेंबरला शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जलंबचे ठाणेदार धीरज बांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, विकास चौधरी उपस्थित होते. पुढे बोलताना डीवायएसपी अमोल कोळी म्हणाले, की सध्याचे युग हे मोबाइलचे आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड केले जातात.

मात्र त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगली पाहिजे. सण, उत्सव साजरा करताना डीजे तसेच इतर वायफळ खर्च न करता गरजूंना मदत केली पाहिजे. समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन उत्सव साजरे व्हावे, अशी अपेक्षा अमोल कोळी यांनी व्यक्त केली. त्यानंतर ठाणेदार धीरज बांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोंगटे, सेवानिवृत्त पोलिस पाटील भगवान आखरे यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला जलंब पोलिस स्टेशन हद्दीतील ३५ गावांतील पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन करून अमोल काळे यांनी आभार मानले. बैठकीच्या यशस्वितेसाठी पोहेकाॅ संजय पोहरकर, गोविंदा व्हनमाने, उद्धव कंकाळे, गोपाळ सोनोने, संदीप गावंडे यांच्यासह जलंब पोलिस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव काळात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान, नेत्ररोग तपासणी, आरोग्य शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन समाजात एक चांगला संदेश दिला पाहिजे. सण, उत्सवाच्या निमित्ताने एकत्र बसून विचारांची देवाण-घेवाण होते. यामधून चांगली दिशा मिळते. गणेशाची स्थापना ते विसर्जनापर्यंत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार धीरज बांडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...