आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपल्या धर्माचा प्रसार, प्रचार करावा; दिढे मामा यांचे प्रतिपादन, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा थाटात

मेहकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनात संसार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु हे सर्व करीत असताना ज्या परमेश्वराने जीवन दिले, त्याची आठवण मात्र घडली पाहिजे, ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या मधे नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे प्रतिपादन प.पू दिढे मामा यांनी केले.

ब्रह्मचैतन्य सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचे परमशिष्य प.पु.दिढे मामा यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा गजानन महाराज मंदिरात ३ एप्रिल रोजी मोठ्या थाटात पार पडला. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, सत्यजित अर्बनचे अध्यक्ष श्याम उमाळकर, गजानन निमदेव, ज्ञानेश्वर पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, वामनराव सांगळे, दिवटे सर, राजेंद्र फडके उल्हासराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी दिढे मामा यांचा आयोजन समितीच्या वतीने सहस्त्रचंद्र दर्शन,शांती पूजन संत श्री गजानन महाराज परिसरातून उत्साहात मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गुरु माऊली दिढे मामा यांची तुला करण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, श्याम उमाळकर, गजानन निमदेव, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सतीश गुप्त, राजेंद्र फडके, सुदेश लोढे आदि मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सतीश मोहरील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...