आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूकीचे गुन्हे:कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू: अरविंद चावरियांचे आश्वासन

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली, बुलडाणा आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा घेऊन त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना पैसे न देता फरार झालेल्या संतोष रणमोडे याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली .

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी भेट घेऊन पावित्रा ट्रेडिंग कंपनीच्या संतोष रणमोडे याच्यावर कारवाईची मागणी केली. १७ जून रोजी केली होती. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अनेक पोलिस स्टेशन मध्ये त्याच्याविरुद्ध शेकडो शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. परंतु शेकडो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाल्यानंतर कोणत्याही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या. यावेळी माजी उपाध्यक्ष देविदास पवार, जाधव पाटील, डॉ. उबरहंडे, संदीप उगले, सिद्धार्थ शर्मा, सतीश पाटील, सोपान जगताप, सागर पवार, रोहित भंडारी,सतीश पडोळ, गुलाबराव गव्हाणे, नारायण पडोळ, सुनील पणेर, वैभव धंदर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...