आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांवर अन्याय:येणाऱ्या काळात गद्दारांना शिवसेनेची ताकद दाखवू ; जालिंदर बुधवत यांचा इशारा

देऊळगाव राजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या काळात गद्दारांना शिवसेनेची ताकद दाखवून देऊ तसेच गेलेले गद्दार म्हणतात की सगळी शिवसेना आमच्या सोबत असून सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहे. त्यांना म्हणावं तुमच्या सोबत कोण आहे याचे उत्तर तुम्हाला या सभेतून दिसेल. गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांना उघड पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, नरुभाऊ खेडेकर, छगन मेहेत्रे यांनी दिली.

पंकज लॉन्स येथे आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, नंदूभाऊ कऱ्हाळे, लक्ष्मणराव पऱ्हाड, भरत शिंगणे,पवन झोरे, योगेश म्हस्के, संभाजी शिंगणे आदींची उपस्थिती होती. यावेळी तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उत्तमराव बोंद्रे, शिवाजी राजे, नामदेव मगर, बाबुराव पऱ्हाड, शिवाजी देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. नरेंद्र खेडेकर, हरिभाऊ वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेनेच्या निष्ठावंत सन्मान सोहळ्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन युवा सेनेचे नेते सिद्धु आंधळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...