आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:आचार्य विद्यासागर महाराज यांचे डोणगावात स्वागत

डोणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ बाबांच्या दर्शनासाठी व चातुर्मासाकरिता प्रख्यात आचार्य श्री संतशिरोमणी १०८ विद्यासागर जी महाराज व त्यांच्या मुनी संघाचे आज २ नोव्हेंबर रोजी डोणगाव येथे आगमन झाले . त्यांचे स्वागत मोठया जल्लोषात करण्यात आले.

श्री यांचा चातुर्मास शिरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थान येथे पार पडले व आता श्रींचा चातुर्मास संपल्यानंतर डोणगाव येथे २ नोव्हेंबर पासून श्री विद्यासागर महाराज जी व त्यांचे सहकारी मुनी वास्तव्यास राहणार आहे. ५ नोव्हेंबर पासून श्री सपना सावजी नगर विठ्ठल रुक्माई प्राथमिक शाळेत पंच कल्याणक महामहोत्सव होणार आहे व ११ नोव्हेंबर पर्यंत श्रींचे दर्शन व मार्गदर्शन डोणगावकरांना होणार आहे.

आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज हे डोणगाव येथे येत असल्याचे कळताच अनेक भाविक भक्त हे डोणगाव नगरीमध्ये पोहोचले आहेत व डोणगाव येथील व्यापारी व राजकीय नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागताकरिता बॅनर लावले होते. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज व यांच्यासह प्रसादसागर महाराज, चंद्रप्रभसागर महाराज, निरामय सागर महाराज ,सिद्धांतसागर महाराज यांचेही डोणगाव नगरीमध्ये आगमन झाले.

बातम्या आणखी आहेत...