आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:अंबाशीत बस चालक-वाहकांचे स्वागत; रुजू झाल्याबद्दल कृतज्ञता

चिखली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबाशी येथील ग्रामस्थांनी ईद, अक्षय तृतीयेचे औचित्य साधून केला सत्कार

सिमेवर लढणारे आपले भारतीय जवान तसेच आपल्या शेतात राबतांना रक्ताचे पाणी करून धान्य पिकवणारा शेतकरी जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच एस.टी. च्या माध्यमातून सेवा देणारे चालक,वाहक सुध्दा महत्वाचे आहे. याची जाणीव ठेवून अंबाशी येथील ग्रामस्थांनी रमजान ईद आणि अक्षय तृतीया या दोन पवित्र सणाचे औचित्य साधून बस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे स्वागत केले.

मागील दोन वर्षात कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाला बळी पडल्यानंतर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात झालेल्या आंदोलनामुळे जवळपास एक वर्ष बंद असलेली बस सेवा नुकतीच एस.टी. कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. उपरोक्त दोन्ही कारणांनी बंद असलेल्या एस.टी. सेवेचा फटका सामान्य जनतेला आर्थिक तसेच मानसिक स्वरूपात सहन करावा लागला. सुरूवातीपासूनच आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच या महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात बस सेवा खंडित झाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. तसेच तोडक्या पगारावर काम करताना प्रचंड आर्थिक तसेच मानसिक कुचंबणेचा सामना करावा लागत होता. म्हणून काही महिन्यापासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही रास्त मागण्यांना धरून बेमुदत राज्य सरकार विरोधात आंदोलन छेडले होते, या आंदोलनाच्या अनुषंगाने झालेला राजकीय गोंधळ सुध्दा महाराष्ट्रातील जनतेला याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला.

परंतु या सर्व पार्श्वभूमीवर बस सेवा परत नव्याने सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वाँचे या बंद झालेल्या बस सेवेमुळे प्रचंड हाल झाले. दरम्यान चिखली-हिवरखेड ही बस सुरू झाली असून या बसचे चालक संतोष वायाळ आणि वाहक सचिन लोखंडे यांचा अंबाशी वासीयांनी बससमोर नारळ फोडून स्वागत केले. तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिक पुरूषोत्तम गवई, अंबाशी ग्रामसेवा सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष, दत्तात्रय देशमुख, उपसरपंच दिलीपराव देशमुख, प्रकाश पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण बघण्यास मिळाले. यावेळी प्रकाश पवार यांनी बोलताना सांगितले की, सर्व जनतेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी खासगी वाहनांचा प्रवास टाळून एस.टी ने प्रवास करावा असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...