आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी दाखल:विदर्भाच्या प्रवेशद्वारी संत मुक्ताबाई पालखीचे स्वागत; हरिनामाचा गजर

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना निर्बंधामुळे गेली दोन वर्ष पायी आषाढी वारीत खंड पडला होता. यामुळे वारकऱ्यांचे डोळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसले होते. यावर्षी पायी वारीचा मार्ग मोकळा झाला असून वारकऱ्यांना पायी वारीचा आनंद घेता येणार आहे. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून ही पालखी विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरात दाखल झाली आहे.

राज्यातील सात मानाच्या पालखींपैकी तसेच प्रथम आगमनाचा मान असलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी ही जवळपास ७०० कि.मी.पायी प्रवास करून ७ जिल्हे २८ तालुक्यातून येणारी पालखी आहे. त्यासाठी पालखीला ३३ दिवसांचा पायी प्रवास विठ्ठलाच्या दर्शनासाठी करावा लागतो. यावर्षी वारीसाठी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे ३ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखी सोहळा कोथळी, मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा प्रस्थान करते वेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती. परंपरेनुसार जुन्या मंदिरातून ही पालखी निघाली होती. पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. रविवारी विदर्भाचे प्रवेशद्वार मलकापूर शहरात आगमन झाले. पालखीचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...