आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट माल ग्राहकांच्या माथी:गहू मिळतो फक्त 277 रू. क्विंटल; ग्राहकांना देतात बुरशी आलेली ज्वारी, जिल्ह्याला मिळाले 1109 क्विंटल तांदळाचे नियतन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याला मे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पंतप्रधान गरीब योजनांतर्गत धान्य वाटपाबाबत शासनाने ६ मे रोजी निर्णय काढला आहे. मात्र यात नमुद गव्हाऐवजी तांदुळ व मका अधिक प्रमाणात दिला जात असून मिळणारी ज्वारी अतिशय खराब आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यात जेवढे ज्वारीचे उत्पादन नाही त्यापेक्षा अधिकची ज्वारी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना दिली जात आहे. ही ज्वारी बुरशी युक्त असल्याचा प्रकार नुकताच उजेडातही आला आहे. तर तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलेला तोच तांदुळ पुन्हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप होत आहे.

पंतप्रधान गरीब योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांची संख्या ६४ हजार २९२ इतकी असून त्यावरील लाभार्थी संख्या दोन लाख ७७ हजार १७१ इतकी आहे. या सर्व लाभार्थींना पाच किलो धान्य वाटप करावयाचे आहे. त्यामध्ये एक किलो गहु व चार किलो तांदळाचा मोफत पुरवठा केला जात आहे. हा सुधारित नियतनानुसार अन्नधान्य वाटप करण्याचा सूचना निर्णयात देण्यात आल्या आहेत. हे धान्य वितरीत करताना ई पॉझ अनिवार्य करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेंतर्गत ही असेच वाटप वाटप करण्याचे नियोजन आहे. मे व जूनचे वितरीत करण्याच्या अन्नधान्याच्या उचलीची मुदत ३१ मे पर्यंत ठेवण्यात आली आहे.

हे धान्य वितरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्या तरी तांदुळाचे नियतन कमी करुन गहु वाटप करण्यात येण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना आधारभूत धान्य, भरड धान्य स्वस्त धान्य दुकानात वितरीत करताना त्यांचा नित्कृष्ट दर्जा दुकानदारांना मोजून प्रमाणित केलेले भरड धान्य मिळावे, अशी मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...