आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विटांचे दर:वीटभट्टीची परवानगी देताना विटांचे दर महसूल प्रशासनाने त्वरीत ठरवावेत; मुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीट भट्टी मालकांना परवानगी देण्यापूर्वी महसूल प्रशासनाने विटांचे दर ठरवून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वीटभट्टी मालक हे मनमानी भावाने विटांची विक्री करत असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

हक्काच्या घराचे स्वप्न रंगवणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य व विटांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम केल्यानंतरही त्या लाभार्थ्यांना वेळेवर संबंधीत पंचायत समितीकडून पैसे मिळत नसल्याचे लाभार्थ्यांमध्ये बोलले जात आहे. पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहे.

अनेकांनी घरकुलाचे बांधकाम सुरु केले असून काही जणांची कामे पूर्णत्वाकडे आली आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादेत घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधीत विभागातर्फे देण्यात आले आहेत. दिवसागणिक सिमेंट, लोखंड, वाळू याच्या किंमतीत वाढ होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने विटांची मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीनशे ते चारशे रुपयांनी विटांचे भाव वाढले आहे. बांधकामासाठी लागणारे अन्य साहित्यांच्या किमतींना वाढीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वाढलेल्या साहित्याच्या किंमती अडचणीच्या ठरत आहे.

महसूल प्रशासनाकडून वीटभट्टी मालकांना वीटभट्टीसाठी परवानगी दिली जात असताना विटांचे दर निश्चित केले जात नाही. वीटभट्टी मालक याचाच फायदा घेत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. वीटभट्टी मालक मर्जीने दर ठरवत असल्याने याचा सर्वाधिक फटका हा घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे महसूल विभागाने विटांचे दर ठरवून द्यावे, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...