आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराजमान:सरपंचपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य निवडीसाठी गावागावात सुरु असलेल्या चुरशीला १८ डिसेंबर रोजीच्या मतदानानंतर पूर्णविराम मिळाला आहे. त्या-त्या गावातील मतदारराजाने आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. मतदानानंतर उमेदवारांचे समर्थक गणिते मांडून आमचाच उमेदवार विजयी होणार हे सांगत आहे. तश्या गप्पा पूर्ण गावा गावात रंगू लागल्या आहे. समर्थकांनी मांडलेली गणित कितपत खरी ठरतात हे मंगळवार, २० डिसेंबर रोजी मतमोजणीतून पुढे येणार आहे. मतदानानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली दिसून येत आहे.

सोळा ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची ८२.२३ टक्के वारी आहे. सोळा ग्रामपंचायती क्षेत्रातील मतदारांची एकुण १८ हजार २४२ संख्या आहे. यात पुरुष ९ हजार ७८८ तर ८ हजार ४५४ महिलांची संख्या आहे. यापैकी ६ हजार ८६८ महिलांनी तर ८ हजार १३३ पुरुषांनी अशा एकूण १५ हजार १ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ३ हजार २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. १६ ग्रामपंचायतीच्या ५० मतदान केंद्रावर उमेदवारांचे भाग्य बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...