आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील तामगाव शिवारातील गट क्रमांक २३,२४ व २५ मधील वहिवाटीच्या रस्त्यात लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जात होती. त्यामुळे शेत रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी तामगाव ग्रामस्थांनी १ ऑगष्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी प्रशासनाने रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.
तामगाव शिवारातील वहिवाटीचा रस्त्यात गावातील एकाने लोखंडी अँगल लावून बंद केला होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना जाण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच गट क्रमांक २३ व २४ मध्ये अकृषक प्लॉट पडले असून गावातील बऱ्याच नागरिकांनी त्या ठिकाणी घरे बांधून ते वास्तव्य करीत आहेत. मागील आठवड्यापर्यंत हा रस्ता सुरू होता. परंतु रस्त्यात लोखंडी अँगल लावून हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे रस्ताच शिल्लक राहिला नाही.
या बाबत ग्रामपंचायतला कळवण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन रस्ता मोकळा करुन देण्यास असमर्थ असल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देवून रस्त्याची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. परंतु समस्या दूर न झाल्याने ग्रामस्थांनी १ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देवून पाठिंबा दिला होता.चौथ्या दिवशी ग्रामपंचायतीने अडवलेला रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी तहसीलदार वरणगावकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी विनोद भिसे, ग्रामस्थ अनिल घिवे, सुभाष पारस्कर, रामधन घिवे, कैलास कडाळे, भैय्या घिवे, उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.