आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:वातावरणातील बदलाने वाढताहेत व्हायरल फिवर चे रुग्ण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सध्या विविध ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने धुळीचे कण पसरत आहेत. एकीकडे विकासाचे हे कारण सुरु असताना दुसरीकडे यामुळे आजारपणही बळावत चालले आहे. याच्या सोबतीला वातावरणातील बदलही व्हायरल फिवर घेऊन येत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णांमध्ये ही मोठया प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे दवाखान्यातील गर्दीही वाढू लागली आहे. धुळीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून शहरात आहे. त्यामुळेही आजारपण वाढत आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये वातावरणात बदल झाला होता. शहरात दिवसभर वाहनांमुळे पसरणारी धूळ दिसत नव्हती तर ती निवांतपणे खाली साचली होती. ती दबतही चालली होती. मात्र आता सगळीकडेच विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे खोदकामाचे प्रमाणही वाढत आहे. ही खोदकामे रस्त्यालगत, निवासी भागातही होत आहेत. त्यामुळे माती जमिनीवर पसरुन वाहनांद्वारे ती वातावरणात ती उडत आहे. पंधरा ते वीस फुटांपर्यंत ही धूळ उडून घरात, दुकानात, कार्यालयात शिरते आहे. वाहनांवर तर त्याचा थर साचतो आहे.

पंधरा मिनिटे जरी एखाद्या व्यक्तीला उभे केले तर तो पूर्णपणे धुळीने माखलेला दिसू लागेल अशी अवस्था सध्या शहरात आहे. याला उपाय पाणी मारणे इतकाच असला तरी तो उपाय मात्र पालिकांनी किंवा तत्सम ठेकेदारांनी केलेला नाही. दुसरे असे की, रस्ता साफ करण्यासाठी फिरणारी मशीनही मोजक्याच भागात फिरवून आणली गेेली. अजूनही काही भागात कामे सुरुच राहणार आहेत. मात्र कामे करताना लोकांना या धुळीचा त्रास होणार नाही याची खात्री घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत आहे व कमीही होत आहे. या वातावरणातील चढ-उतारामुळे आजार वाढले आहेत.

शहरामध्ये होतेय दररोज किमान ५० खोकल्याच्या औषधांची विक्री
लोकांचा आयुर्वेदावर विश्वास असणे काही गैर नाही. आजीचा बटव्याचा वापर अनेक जण करतात. सर्दी-खोकल्यासाठी घरगुती उपाय करतानाही दिसतात. सध्या शहरात हे व्हायरल इन्फेक्शन आहे. त्यामुळे सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वातावरणातील हा बदल असू शकतो. मात्र त्यामुळे दररोज कापूर व इतर प्रकियेतून बनणारी औषध घरी बनवण्यासाठी रुग्ण घरी घेऊन जात आहेत. खोकल्याच्या तर किमान ५० बॉटल तरी विक्री होत आहे.-ललितकुमार कोठारी, औषध विक्रेते, बुलडाणा

अनेकांना धुळीपासून अस्थमासारखा आजार वाढण्याची भीती
वर्षभर धुळीत राहिल्यास त्यामुळे मोठया प्रमाणात दमा, अस्थमा यासारखे आजार वाढू शकतात. व्हायरल इन्फेक्शन तर सध्या आहेच. त्यामुळे सर्दी, खोकला या सारखे रुग्ण वाढू लागले आहे. धुळीमुळे ही खोकला येऊ शकतो. कारण धुळीचे कण नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे घशात अडकल्यास त्यापासून खोकला होऊ शकतो. त्यासाठी आठ पंधरा दिवसही धुळीत राहिले तर त्याचे इन्फेक्शन होऊ शकते. -डॉ.सचिन झगडे, सहयोग रुग्णालय, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...