आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:विष प्राशन करून महिलेची आत्महत्या; मर्ग दाखल

बुलडाणा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर येथील मेघा अल्पेश अग्रवाल वय ४० या महिलेने घरामध्ये होणाऱ्या क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना १८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला मर्ग दाखल केला आहे.

मेघा अग्रवाल यांचे आपल्या पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद होत असत. त्यामुळे तिला आपल्या पाल्यांची चिंता सतावत असे. त्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी माहेरच्या लोकांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पुढील तपास ए.पी.आय अमरनाथ नागरे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...