आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:विष प्राशन करून महिलेची आत्महत्या; मेहकर पोलिस ठाण्यात नोंद

बुलडाणा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर येथील मेघा अल्पेश अग्रवाल (४०) या महिलेने घरातील क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

ही घटना १८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मेघा अग्रवाल यांचे पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद होत असत. त्यामुळे तिला आपल्या पाल्यांची चिंता सतावत असे. त्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी माहेरच्या लोकांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पुढील तपास एपीआय अमरनाथ नागरे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...