आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जीपणा:सिझर करताना पट्टी पोटात राहिल्याने महिलेचा मृत्यू; डॉक्टरवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • बुलडाण्यात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सिझर करताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात बँडेज पट्टी राहिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे महिलेच्या मृत्यूस जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यासह संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील परमेश्वर बळीराम पाखरे यांची पत्नी पूजा पाखरे यांना ७ एप्रिल रोजी येथील रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी पूजाचे सिझर केले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिझर केल्यानंतर पूजाच्या पोटातच बँडेजची पट्टी राहून गेली. ११ एप्रिल पर्यंत ती रुग्णालयात होती. तिथे तिचे पोट दुखत होते. पोट दुखणे थांबत नसल्याने तिला अकोला येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. १९ एप्रिलपर्यंत तिच्यावर अकोला येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिला रुग्णाालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर ती घरी परतली. घरी परत आणल्यानंतर पुन्हा पूजाला पोटाचा त्रास होऊ लागला.

त्यामुळे पती परमेश्वरने पूजाला १० जून रोजी खामगाव येथील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी आणले. या वेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सोनोग्राफी केली असता पोटात बँडेजची पट्टी असल्याचे दिसून आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून पट्टी पाेटातून बाहेर काढण्यात आली. मात्र, तिचा त्रास अजूनच वाढला. त्यामुळे बुलडाण्यात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...