आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीओला घेराव:घरकुलाच्या लाभासाठी महिलांचा बीडीओला घेराव

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पारखेड येथील शेकडो महिलांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन थेट गटविकास अधिकाऱ्यास घेराव घालत ‘आम्हाला हक्काचे घर द्यावे’, अशी मागणी केली.

मागील कित्येक वर्षांपासून तालुक्यातील पारखेड येथील लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्यापही त्यांना घरकुल देण्यात आले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेतील घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी पारखेड येथील शंभर ते दीडशे महिला आज शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयावर धडकल्या.

यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांना घेराव घालत चर्चा करून गरजूंना घरकुलाचा प्रथम लाभ द्यावा अशी मागणी केली. विधवा, भूमिहीन, वंचित घरकुल धारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी महिलांनी पंचायत समिती आवारात एकच गर्दी केली होती. घरकुलाचा लाभ मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला. तर प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेतील लाभ हा ग्रामपंचायतीमार्फत तयार झालेल्या यादी प्रमाणे देण्यात येईल तसेच नवीन नावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे आश्वासन गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांनी महिलांना दिले. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...