आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहन:बिबी येथील महिलांचा देशी दारू दुकानाविरोधात आत्मदहनाचा इशारा ; महिला सीईओंकडून महिलांना न्याय नाही

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर येथून बिबी येथे स्थलांतरीत करण्यात आलेले देशी दारूच्या दुकानावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्या संदर्भात अधिनस्त यंत्रणेमार्फत चौकशी करून सदर ग्रामसभा नियमानुकूल बाबत योग्य तो निर्णय घ्यावा तो पर्यंत ग्रामसभेची अंमलबजावणी करू नये असा स्पष्ट आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतरही बुलडाणा जिल्हा परिषदेने कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर बिबी येथील सुनीता भांड, जिजाबाई सदावर्ते आणि लता घाईत या महिलांनी येत्या १७ जून रोजी बिबी येथील मुकेश बगडिया यांच्या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. एका दिवसावर आलेल्या या इशाऱ्यामुळे पोलिस प्रशासन मात्र खडबडून जागे झाले.

या बाबत माहिती अशी की, देशी दारू परवाना क्र ६४/८०८१ हा चंद्रपूर येथून बिबी येथे स्थलांतरीत करण्यात आले. सदर दुकानासाठी २०१८ रोजी ग्रामपंचायतीचा घेतलेला ठराव हा चुकीचा व खोटा असून तसेच हे दारु दुकान स्थलांतर करण्यासाठी देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र सुध्दा गैर कायदेशीर व तत्कालीन सरपंच यांनी स्वताच्या फायद्यासाठी ग्रामस्थाची फसवणूक केल्याचा आरोप करीत बिबी येथील सुनीता भांड, जिजाबाई सदावर्ते आणि लता घाईत या महिलांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुध्दा केले होते. त्यावेळी सुध्दा सदर महिलांच्या विरोधात प्रशासनाने निकाल दिला होता. या निकालाच्या विरोधात सदर महिलांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली. यावर अमरावती आयुक्त यांनी २०/२/२०२२ रोजी या ठरावाची अंमलबजावणी करू नये, असा आदेश पारीत केला. देशी दारूच्या विरोधात आयुक्तांनी आदेश पारीत करून सुध्दा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही यावर कोणतीच कारवाई केली नाही. अखेर सदर तक्रारकर्त्या महिलांनी बिबी येथील देशी दारूच्या विरोधात आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला असून त्यांच्या आत्मदहनाच्या या इशाऱ्यामुळे पोलिस प्रशासनात आता जागे झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या महिलाच असल्याने महिलांना न्यायाची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...