आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:गुटखा विक्रीच्या बंदीसाठी बीबीतील महिला आक्रमक

बुलडाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात होणारी अवैध गुटखािवक्री तातडीने बंद करण्यात यावी, या मागणीसाठी बिबी येथील महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मेहकर, लोणार तालुक्यासह जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे युवा पिढीचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे ही गुटखा विक्री तत्काळ बंद करुन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिबी येथील महिलांनी या आंदोलनादरम्यान केली. जिल्ह्यातील मेहकर, लोणारसह तेराही तालुक्यांत कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची विक्री अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांतून सुरू आहे. त्यांच्या आशीर्वादाने मेहकर, लोणारसह तेराही तालुक्यात गुटखा माफिया वाहनांद्वारे गुटख्याचे जाळे पसरवत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक पानटपरीवर तसेच किराणा दुकानात गुटखा मिळत आहे.

यामुळे युवा पिढीचे शारीरिक व मानसिक नुकसान होत आहे. मात्र, प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. गुटखा माफिया त्यांना एक लाख रुपयांचा दरमहा हप्ता देत असून प्रत्येक गावात गुटख्याची अवैध विक्री करत आहेत, असा आरोप महिलांनी आंदोलनावेळी केला. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच तेराही तालुक्यांमधील गुटखा माफियांवर तत्काळ कारवाई करून जिल्हा गुटखा मुक्त करण्यात यावा, अशी मागणी यावेळी या महिलांनी केली. यावेळी बिबी येथील सुनीता श्रीकिसन भांड, लता सखाराम घाईत, जिजा भगवान सदावर्ते यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवून महिलांना रोखले आणि ताब्यात घेतले. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

बातम्या आणखी आहेत...