आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक मोर्चा:दारूबंदीसाठी सुनगावच्या महिलांचा पोलिस स्टेशनवर धडक मोर्चा

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात कायमस्वरुपी दारुबंदी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सुनगाव येथील महिलांनी ३ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदारांना निवेदन दिले.

जळगाव जा. तालुक्यातील सुनगाव हे जवळपास अकरा ते बारा हजार लोकसंख्येचे गाव आहे. परंतु या गावात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. गावात दिवस रात्र अवैधरीत्या सर्वच कंपनीची दारू मिळते. तसेच काही अवैध दारूची दुकाने शाळेच्या पन्नास मीटरच्या परिसरात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दारुडे त्रास देत आहेत. यावरही कळस म्हणजे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अवैध देशी दारू व गावरान दारूची विक्री करण्यात येत आहे. मद्यधुंद लोक दारू पिऊन त्या ठिकाणी शिवीगाळ करतात. या बाबत अनेक वेळा नागरिकांनी दारू विक्रेत्यास सांगितले. परंतु ते अरेरावीची भाषा वापरून खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या देतात. पुतळ्याच्या ठिकाणी दारूच्या नशेत कोणतीही विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात कायमस्वरुपी दारु बंदी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुनीता हेलोडे यांच्या नेतृत्वात सुनगाव येथील महिला व पुरुषांनी केली आहे. यावेळी वंचितच्या पार्वताबाई इंगळे, तालुकाध्यक्ष सुनीता हेलोडे, सोनम वानखडे, ताई हिवराळे, रमा इंगळे, यमुना जाधव, नंदा तायडे, विजयमाला वानखडे, उज्वला हिवराळे, अर्चना तायडे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवई, उपाध्यक्ष सुनील बोदडे, ज्ञानेश्वर तायडे, तुकाराम जाधव, बळीराम जाधव, सिद्धार्थ वानखडे, अनिल सावळे, सुनील जाधव, सुनील हिवराळे, यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...