आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी स्वत:ला कमजोर समजू नये. ती घराला चालवणारी लक्ष्मी आहे, असे आवाहन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनंदा खरात यांनी केले. "मी सावित्री बोलतेय’ या कार्यक्रमातून त्यांनी क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर सिरसाट हाेते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुनंदा खरात, सहाय्यक शिक्षिका माधुरी राजपूत यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट इयत्ता दुसरीतील काव्या साखरे हिने उलगडला.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी गीत, भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर सहाय्यक शिक्षिका गंगा गिरी, मनीषा चव्हाण, निकिता निगडे यांनीही आपल्या भाषण व गीतातून विचार व्यक्त केले. या शाळेतील सर्व शिक्षकांनी या वटवृक्षाची एक एक फांदी मिळून हा भला मोठा वृक्ष या ठिकाणी फुलवला आहे.
तो असाच फुलत राहो... अशा सदिच्छा सुनंदा खरात यांनी व्यक्त केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान अश्विनी जाधव हिला मिळाला. कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक, शिक्षीका बनलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे कामकाज दिवसभरासाठी हाताळले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश खिल्लारे यांनी केले, तर सूत्रसंचालन सृष्टी मोरे हिने केले. आभार क्रांती झिने हिने मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.