आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांकडे मागणी‎:जानेफळमधील अवैध दारूविक्रीविरोधात‎ महिला एकवटल्या, घेतला आक्रमक पवित्रा‎

जानेफळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या‎ दारूविक्रीवरोधात महिलांनी‎ आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दारू‎ विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या‎ मागणीचे निवेदन देण्यासाठी‎ जवळपास ४० महिला जिल्हाधिकारी‎ आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर‎ धडक दिली.‎ रमाई नगर येथील महिलांनी‎ बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी‎ जिल्हाधिकारी आणि पोलिस‎ अधीक्षकांना निवेदन दिले. त्यामध्ये‎ त्यांनी नमूद केले की, जानेफळ येथील‎ माता रमाई नगरात काही जण‎ अवैधरीत्या दारूविक्री करत‎ असल्याने महिलांसह सर्वसामान्यांना‎ त्रास होत आहे. उघडपणे दारूविक्री‎ होत असल्याने तिथे काही लोकांमध्ये‎ वादही होतात.

काही गुंड प्रवृत्तीचे‎ लोक कायद्याला न जुमानता‎ अवैधरीत्या दारूची विक्री करत‎ आहेत. ज्या ठिकाणी अवैध दारूची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विक्री केली जाते, तेथून विद्यार्थी व‎ विद्यार्थिनी श्री सरस्वती शाळेत जात‎ असतात. अशावेळी काही जण‎ दारूच्या नशेत असल्याने महिला व‎ विद्यार्थिनींबाबत लज्जास्पद कृत्य‎ करत असतात. परिणामी सामाजिक‎ भावना दुखावल्या जाऊन गावात‎ अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शक्यता आहे. त्यामुळे अशा‎ अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांवर‎ कठोर कारवाई करून गुन्हे दाखल‎ करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे‎ करण्यात आली आहे. महिलांनी या‎ निवेदनाच्या प्रती संबंधित अधिकारी‎ आणि लोकप्रतिनिधींनाही दिल्या‎ आहेत.‎

दारू विक्री बंद न झाल्यास शहर बंद ठेवण्याचा इशारा‎ या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी‎ महिलांनी केली आहे. दि. ७ फेब्रुवारीपर्यंत अवैध दारूविक्री बंद न झाल्यास‎ याच्या निषेधार्थ जानेफळ बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही महिलांनी या‎ निवेदनाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...