आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅस सिलेंडरला श्रद्धांजली अर्पण करीत लाकडाच्या मोळीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वात चुलीवर स्वयंपाक करीत केंद्रातील भाजपा सरकारच्या दरवाढीचा ९ मे रोजी निषेध व्यक्त करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल विशेष करून गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सुध्दा केंद्र सरकारने बंद केले आहे. यासोबतच वारंवार होत असलेल्या भाववाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे घरात महिलांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या सर्व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने उपहासात्मक श्रद्धांजली गॅस सिलेंडरला वाहून लाकडाच्या मोळीची पूजा करून व चुलीवर स्वयंपाक करत भाजपा सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच लवकरात लवकर डिझेल, पेट्रोल, गॅस व जीवनाश्यक वस्तू यांचे भाव कमी करून जनसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिला कॉग्रेस जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांनी दिला.
या आंदोलनात महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुनंदा पवार, किरण ठाकूर, मनीषा अवचार, रेश्मा पाटील, अस्मिता मापारी, पंचफुला पाटील, संगीता वनारे, पूजा मिरकुटे, अश्विनी मोरे, प्रज्ञा चोपडे, मीरा बावस्कर, कविता पाटील, लक्ष्मी वनारे, माया दौंड, मीरा घाटे, वर्षा राजपूत, किरण चव्हाण, ज्योती राजपूत, रेखा दीक्षित, निकिषा पाटील, पूजा पाटील यांचे सह कॉग्रेस महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.