आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवार, १० मार्च रोजी दुपारी कर्तृत्ववान महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे यांचे मार्गदर्शनात हा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी महावितरणच्या सहायक अभियंता श्रद्धा वॉर्डेकर, बुलडाणा अर्बनच्या अनघा रिंडे, कामगार सुप्रिया शेळके, डॉ. संगीता खोना, डॉ. एकता पिंपरकर, सौ. चांडक, सरस्वती संगीत क्लासच्या मनीषा औताडे लता बजाज, राधा केदार शीतल नीलटकर, पूजा भुतडा, प्रीया हवा, नंदा शिंदे, नलिनी मितकरी, सुवर्णा गावंडे ई महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नरूभाऊ बजाज, माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंग ठाकूर, तर विशेष अतिथी प्रभा बजाज या उपस्थित होत्या. तसेच राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वनमाला पेंढारकर यांचा पण सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.