आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

मलकापूर पांग्रा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत मागणी करून व निवेदन देवूनही ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्यासंदर्भात उपाययोजना न केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज २४ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी बंडू उगले यांनी चार दिवसात गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

चार दिवसांत सुरळीत करू
गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राजेंद्र शिंगणे यांची भेट घेत पंचायत समितीचे वीज अभियंता यांना बोलवून मागील सहा महिन्यांपासून केशव शिवनी धरणावरील विद्युत पुरवठा बंद असल्याबाबत चर्चा केली. तर हनवतखेड येथील धरणावरील विजेचाही प्रश्न मांडण्यात आला. -बंडू उगले, मलकापूर पांग्रा

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कृत्रीम पाणीटंचाईला त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्या किरण काकडे यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढला.

ग्रा.पं.चा कानाडोळा
ग्रामपंचायत मध्ये पाणी प्रश्न मांडला. परंतु पाणी प्रश्नावर ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करीत आहे. सदस्य असतानाही ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा घेऊन यावे लागले. त्यात आज ग्राम विकास अधिकारीच गैरहजर असून ही बाब ग्रामपंचायतीच्या ग्राम विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करते.
-किरण काकडे, सदस्या

बातम्या आणखी आहेत...