आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती:नवसाला पावणारा खामगावचा लाकडी गणपती

गिरीश पळसोदकर | खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अय्यायाची कोठी भागातील श्री गणेश मंदिरातील लाकडी गणपती खामगाव करांचे आराध्य दैवत असून हा गणपती नवसाला पावणारा गणपती असल्याची आख्यायिका आहे. गणेशोत्सव काळात भक्तांना दर्शनासाठी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या मंदिरात विशेष करून गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीत भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा गणेशोत्सवात मंदिराची दारे दर्शनासाठी उघडी राहणार असल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या मंदिरातील मुर्ती ही सहा फुटाची आहे. ती पूर्णपणे लाकडातून बनवण्यात आली आहे. या मूर्तीवर सोन्या चांदीचे अलंकार आहे. पुरातन व नवसाला पावणारा गणपती असल्याची आख्यायिका आहे. या लाकडी गणपतीच्या मूर्तीची स्थापना सुमारे दीडशे वर्षापुर्वी अय्या लोकांनी केली असल्याचे बोलले जाते. १९९६-९७ मध्ये या मंदिराचा जिर्णोध्दार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर संस्थानची प्रगती दिवसेंदिवस होत आहे.

शिवाय भक्तांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. गणपतीची ही मुर्ती रेखीव व आकर्षक आहे. अशा प्रकारची मुर्ती कदाचीत महाराष्ट्रात आढळणार नाही. शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघते. या मिरवणुकीला फरशी भागातून सुरूवात करण्यात येते. या विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणपतीला मानाचे प्रथम स्थान आहे. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. ती आजही कायम आहे. जोपर्यंत लाकडी गणपतीची मिरवणुक फरशीवर येत नाही आणि तेथून पुढे मार्गस्थ होत नाही, तोपर्यंत विसर्जन मिरवणुक पुढे जात नाही.

बातम्या आणखी आहेत...