आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाज:पदोन्नतीसाठी तहसील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.

या मागणीसाठी २७ रोजी विभागीय आयुक्तांशी संघटनेने चर्चा केली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाकडून अद्यापही कुठलाच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

५ डिसेंबर रोजी निदर्शने, ९ डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे, १३ डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण व २० डिसेंबर रोजी लेखणी बंद आंदोलन, २३ डिसेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप तर २६ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. हे आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष नीरज काकडे व संजय टाके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनात अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...