आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची दिरंगाई:खांडवी ते पंचगव्हाण रस्त्याचे काम चार वर्षांपासून रखडले ; पावसाळ्यात होणार हाल

संग्रामपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता चकाचक करण्याचे काम हाती घेतले असून खांडवी ते पंचगव्हाण व्हाया पातुर्डा दरम्यान बहुतेक ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु काही ठिकाणी या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले. अर्धवट कामामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ज्या ठिकाणी रस्ता जोडला जातो, त्या ठिकाणी रस्त्याची जोडणी करण्यात आली नाही. अशा ठिकाणी अर्धा फुटापर्यंत खड्डा पडला आहे. सिमेंट रस्ता व गिट्टी अंथरलेला रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनांना या खड्ड्यांचा त्रास होत असल्याने वाहनधारक रस्ता टाळताना दिसत आहेत. रस्त्यावर असलेल्या अंतरामुळे जड वाहन चालवणे अवघड झाले आहे. तर रस्त्यावरील अंतरामुळे मणक्यात ही गॅप आल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. येथील ईदगाह ते प्राथमिक आरोग्य केंद्र दरम्यानचा रस्त्यावर नुसती गिट्टी अंथरलेली आहे. पावसाळ्यात पाणी साचून या रस्त्याला नदीचे रुप येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने जातील कशी, हा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र ते उर्दू हायस्कूल व अशोका फ्री बोर्डिंग पर्यंतची जोडणी रखडली आहे. हा रस्ता रहदारीचा आहे. परंतु या रस्यावरही चिखल व गिट्टी असल्यामुळे या रस्त्यावर वाहने फसणार आहेत.

या रस्त्यावरून सावधपणे वाहने चालवले तरीही अपघाताची भीती वाटत आहे. शासन कोट्यवधी रुपयांची कामे करवून घेत असताना यावर देखरेख करते की नाही. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या रस्त्याने नांदुरा ते तेल्हारा ही वाहतूक वाढली आहे. महामंडळाची बस सेवा जळगाव तेल्हारा व्हाया पातुर्डा व शेगाव ते व्हाया पातुर्डा अशी सुरू झाली आहे. या बस पावसाळ्यात टिकून राहण्यासाठी रस्त्याच्या जोडण्या करणे गरजेचे झाले आहे. जोडण्या करून आवश्यक तिथे छोटे गतिरोधक टाकल्यावर तूर्तास रस्ता वाहतुकीला योग्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...