आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील भोगावती नदीचा इंग्रजकालीन पूल पाडून त्याठिकाणी नवीन पुलाचे काम माहे एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर कामाचा आजपर्यंत पायाच पूर्ण झाला असून पुला शेजारून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असून पहिल्या पावसातच मुरूम टाकून तयार केलेला रस्ता वाहून जाण्याची शक्यता असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, सीआरएफमधून तीन कोटी रुपयांचा भोगावती नदीवर पूल अनेक दिवसांपासून मंजूर झाला आहे. सदर कामाचा कंत्राट हा पलसिद्ध कन्स्ट्रक्शनला मिळाला होता. मात्र पलसिद्ध कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम सार इन्फ्राटेक औरंगाबाद यांच्याकडे वळते केले. माहे एप्रिल पासून हे काम कासवगतीने सुरू आहे. पलसिद्ध कन्स्ट्रक्शनने हे काम दोन महिन्यात पूर्ण केले असते परंतू, सार इन्फ्राटेक कंपनीने राजकीय वरदहस्त लाभल्याने हे काम तोडून घेतले. तीन महिन्यात सदर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कमी मजूर येथे काम करत असल्याने एका वर्षात हे काम पूर्ण होईल याची सूतराम शक्यता नाही. पंधरा दिवसावर पावसाळा येऊन ठेपला असताना ठेकेदार मयूर बिडवे अगदी निकृष्ट दर्जाचे साहित्य टाकून कॉलम उभे करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सदर काम रेंगाळत चालल्याने पाऊस पडल्यास रस्ता बंद होईल.
दरम्यान, येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. साखरखेर्डा येथे मोठी बाजारपेठ असल्याने आजुबाजूच्या ३० गावांचा दैनंदिन संपर्क येतो. सवडद, मोहाडी, राताळी, लव्हाळा, मोहखेड, शिंदी, अंतत्रीखेडेकर, हिवरखेड, अंबाशी, लोणी, अशा अनेक गावांशी या गावाचा सहा महिने संपर्क तुटणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळकरी मुलांना शाळेत यायला कोणताच पर्यायी मार्ग नाही. लव्हाळा, मेरा रोड पूर्वीच हा पूल असल्याने मेहकर मार्गे म्हणजेच सहा किमी अंतरावर असलेल्या नागरिकांना साठ किलोमीटर वरून हेलपाटा मारून येथे यावे लागणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.. दरम्यान पलसिद्ध कन्स्ट्रक्शन च्या मदतीने हे काम १५ जून पूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.