आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाई:भोगावती नदीच्या इंग्रजकालीन पुलाचे काम स्लॅब मंजुरीअभावी रखडले; पहिल्या पावसात वाहिला पर्यायी पूल

साखरखेर्डा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भोगावती नदीचा इंग्रजकालीन पूल पाडून त्याठिकाणी नवीन पुलाचे काम माहे एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम अपूर्ण असल्याने पुला शेजारून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाल्याने पहिल्या पावसातच मुरूम टाकून तयार केलेला रस्ता वाहून जाण्याची शक्यता दिव्य मराठीने २६ मे रोजी वर्तवली होती मात्र तरिही सबंधित यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. अखेर १४ जून रोजी रात्रभर पडलेल्या पावसाने हा पर्यायी पुल वाहुन गेला व अनेक गावाचा संपर्क तुटला होता.

सी. आर. एफ मधून ३ कोटींचा भोगावती नदीवर पूल मंजूर झाला आहे. सदर कामाचा कंत्राट हा पलसिद्ध कन्स्ट्रक्शनला मिळाला होता. मात्र पलसिद्ध कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम सार इन्फ्रॉटेक औरंगाबाद यांच्याकडे वळते झाले. एप्रिलपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. कमी मजूर येथे काम करत असल्याने पावसाळ्यापूर्वीच हे काम होणे अपेक्षित होते. पण ते पूर्ण झाले नाही. दरम्यान, ठेकेदाराने रहदारी करता जुना पुल पाडून शेजारी पर्यायी पूल तयार केला होता. पूल वाहुन गेल्याने तुटला असून तो आता ६ महिने तुटण्याची शक्यता आहे.

नवीन पुलाचे बांधकाम वाहून जाण्याची भीती
पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली पण डिझाईन साठी वेळ लागला. त्यापूर्वी पुल पाडलेला होता मुख्य अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे या कामाला दिरंगाई झाली. दरम्यान, रहदारीची तारांबळ उडाली असून ठेकेदार अक्षरशः हतबल झाला आहे. सदर काम स्लॅब लेव्हल ला आले असताना स्लॅबला मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसून पुराने आता नवीन पुलाचे बांधकाम वाहून जातेय की काय अशी भीती ठेकेदाराला आहे. सबंधित यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्याने ठेकेदाराला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जड वाहतुकीस पर्यायी पूल बंद
रात्रीच्या पावसात निर्माण केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पोलिसांच्या मदतीने सकाळी पुन्हा सेतू बांधल्याने मार्ग पूर्ववत झाला असला तरी देखील जड वाहनाने येथून जाणे धोक्याचे झाले आहे. पावसाने सदर रस्ता वाहून जाईल पुन्हा तयार करावा लागेल अशी कसरत सुरू आहे.

.... माझ्या जबाबदारीवर नदीच्या पुलाचे काम सुरु करणार
पुलाचे बांधकाम उत्कृष्टरीत्या सुरू आहे. अंदाजपत्रकानुसार लोखंड वापरले असून त्याची पाहणी वरिष्ठांनी केली आहे. स्लॅब लेव्हल पर्यंत काम येऊन ठेपले असताना मंजुरी मात्र अद्याप मिळालेली नाही. तरी देखील मी माझ्या जबाबदारीने सदर काम सुरु करणार आहे. पुलाचे डिझाइन एक महिना लांबल्याने काम आटोपले नाही.
-मयूर बिडवे,ठेकेदार

... संबधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा
पालकमंत्र्यांकडे लवकर काम पूर्ण व्हावे अशी मागणी केली आहे. तर आपण सबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.
-सुधीर बेंदाडे, महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी, बुलडाणा.

बातम्या आणखी आहेत...