आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाघांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीचा जतन याबाबत जागृती करण्यासाठी जागतिक स्तरावर २९ जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस, त्याचप्रमाणे कर्तव्यावर असताना वन शहीद झालेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३१ जुलै रोजी वर्ल्ड रेंजर डे म्हणून साजरा केला जातो. या दोनही दिवसांचे औचित्य साधून अमरावती वन विभागातील वन अधिकाऱ्यांसाठी बुलडाणा वन विभागातर्फे २९ जुलै रोजी येथील बुलडाणा रेसिडेन्समध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित कार्यशाळेत स्वप्नील सी. खटी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलडाणा, जी. के. अनारसे वनसंरक्षक (प्रा.) अमरावती, एस. राममूर्ती, जिल्हाधिकारी , चंद्रशेखरन बाला एन. उपवन संरक्षक अमरावती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री दिलीप विसपुते, अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त , उपवन संरक्षक अकोला अर्जुना के.आर., उपवन संरक्षक अक्षय गजभिये, विभागीय वन अधिकारी (दक्षता) अमरावतीचे व्ही. डी. डेहनकर यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे प्रास्ताविक बुलडाणा वनविभागाचे अक्षय गजभिये यांनी केले तर उपस्थित स्वप्नील खटी, जी.के. अनारसे, एस. राममूर्ती उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेत व्याघ्र व्यवस्थापन, जनगणना, ट्रॅकिंग, अधिवास पुनर्संचयन, वन गुन्हे, जंगलातील आग प्रतिबंध आणि नियंत्रण, धाड सत्र कार्यवाही, बांबू संरक्षण शिबिर, अटल आनंदवन घनवन योजना, अवैध वृक्षतोड, वन्यजीव रेस्क्यू ऑपरेशन, रस्ता व नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड या सह विविध विषयांवर पीपीटीव्दारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सादरीकरण केले. त्यानंतर वनसंवर्धन, वन व्यवस्थापन, वन्यजीव संवर्धन या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल वन अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रक आणि गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.