आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:जागतिक दिव्यांग दिन व समता पर्वचे आज आयोजन

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिवस आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता पर्व साजरा करण्यासाठी विराट मल्टिपर्पज फाऊन्डेशनच्यावतीने दिव्यांग मेळाव्याचे ३ डिसेंबर रोजी पत्रकार भवन, ग्रामीण पोलिस स्टेशन जवळ दुपारी बारा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांग मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सुविधा, आरोग्य विषयक माहिती तसेच संविधान विषयक माहिती, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विषयक माहिती देण्यात येणार आहे. तसेच नुकतेच शासनाने पहिले स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्यामुळे दिव्यांगांना काय फायदे होतील, याविषयी चर्चासत्र होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मधुकर पाटील यांनी केले आहे

बातम्या आणखी आहेत...