आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय येथे १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे जनुना तलाव येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयामधील एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट सुहास पिढेकर तसेच १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमांडिंग ऑफिसर अमित भटनागर, प्राचार्य धनंजय तळवणकर, प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.काळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.व्ही. पडघान, प्रा. कुटेमाटे यांनी जनुना तलाव येथे केले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य एनसीसी कॅडेटला योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य तळवणकर यांनी सांगितले की, इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस वेटलँड्स डे साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला.
असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला. पाणथळ प्रदेश नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्य शेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. तसेच डॉ.काळे यांनी सुद्धा कॅडेट यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे वाया गेलेली जमीन म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचवण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. जनुना तलाव येथे साफसफाई करण्यात आली. यामध्ये युनिट मधील ७८ एनसीसी कॅडेट तसेच सुभेदार मेजर धर्मेंद्र सिंग, सुभेदार पाल, प्रा.अनिकेत वानखेडे, प्रा.अशोक झुंझारे, प्रा.सपकाळ, प्रा.थाठे, प्रा.ठोंबरे, कॅडेट गणेश बेलोकर, सूरज घाटे, भूषण थोरात, ज्योत्स्ना भिडे, सुरभी देवरे इतर कॅडेट विद्यार्थी हजर होते, अशी माहिती प्रा.डॉ.रागिब देशमुख यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.