आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाचे धडे:शिबिरातून 5 हजार साधकांना दिले योगाचे धडे ; योगाचे प्रशिक्षण देताहेत कल्याण गलांडे

खामगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगाचे महत्व सर्व सामान्यांना अवगत व्हावे व ते योगाकडे वळावे, त्यादृष्टीने येथील योगशिक्षक कल्याण गलांडे हे गत सुमारे २० वर्षांपासून कार्यरत आहे. साधकांना योगाचे धडे देण्याबरोबरच योगशिक्षक निर्माण करण्याचे काम करत आहेत. गत २० वर्षात त्यांनी शहर व परिसरातील विविध भागात योग शिबिराच्या माध्यमातून सुमारे पाच हजार साधकांना योगाचे धडे दिले, हे विशेष! त्यामुळे योग साधकांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनेक फायदे झाले आहेत. येथील अनिवासी योगशिक्षक वर्ग घेवून त्यांना योगाचे प्रशिक्षण देवून एक नव्हे दोन नव्हे तब्बल वीस योगशिक्षक तयार केले आहेत. हे योगशिक्षक आज योगाचे प्रशिक्षण शहरातील विविध भागात तसेच गावोगावी जात प्रशिक्षण देत आहेत.

दिवसेंदिवस योगविषयाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारने २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. गलांडे हे योग विद्याधाम नाशिक यांच्या माध्यमातून खामगाव येथे शाखेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जात नि:शुल्क योग प्राणायाम वर्ग घेत आहे. आपले हे कार्य अविरतपणे व निस्वार्थ भावनेने यापुढेही चालु ठेवण्याचा मानस गलांडे यांनी व्यक्त केला आहे. योगविद्याधाम नाशिक शाखा खामगाव यांच्या माध्यमातून नि:शुल्क योग प्राणायाम प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. या कार्यात त्यांना योग विद्याधाम नाशिक व खामगावचे पदाधिकारी यांचे सहकार्य करत आहेत. त्यांनी योगा संदर्भातले योग प्रशिक्षण वर्ग व त्याबरोबरच योग विद्या गुरुकुलचे सर्व अभ्यासक्रम, योगा प्रमाणीकरण तीन परीक्षा श्रेष्ठ श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...