आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन:संपत्तीचे वारसदार असाल, पण बाळासाहेबांचे आम्हीच

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंना सोडणे हे मनाला पटत नव्हते, दोन-अडीच वर्ष भाडेकरू जरी आपल्या घरात राहत असला, तरी त्या भाडेकरू विषयी जिव्हाळा निर्माण होतो. इथं तर तब्बल साडेतीन दशके सोबत होती, ते सोडताना वाईट जरी वाटलं तरी भगवा वाचवण्यासाठी हे काम करणं गरजेचं होतं. आज आम्हाला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार जरूर असाल, पण बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत, अशा शब्दात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्यांना ठणकावले.

पालिकेच्या सांस्कृतिक भवनात शिवसेनेच्या हिंदूगर्व गर्जना मेळाव्यात पाटील बोलत होते. खा. प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, महिला आघाडी खामगाव तालुका प्रमुख इंदुताई राणे, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी राणे, भोजराज पाटील, संजय अवताडे उपस्थित होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच काँग्रेसविरोधात लढत आलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही आयुष्यभर लढलो, ज्या विचारांविरुद्ध लढलो, आणि तुम्ही स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचे सोबतच आघाडी केली. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही की आम्ही, असा सवाल खा. जाधव यांनी केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष वासुदेवराव क्षीरसागर, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी राणे, संतोष बोरसे, हरिभाऊ पारस्कर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

बातम्या आणखी आहेत...