आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामरण्यापूर्वी देशासाठी काय केले हे सांगता आले पाहिजे. जीवनात देशासाठी शक्य होईल ते प्रयत्न करा. सोबतच मातीची नाळ कधीच तोडू नका. असे सांगून माती कधी सेकंड हॅन्ड होत नसते. मातीची नाळ जोडतो तो देशसेवाच करीत असतो, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केले. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा सन्मान आज शहरातील माँ जिजाऊ अर्बनच्या वतीने करण्यात आला. डॉ. बावस्कर यांनी विंचू व सर्प दंश यावर जागतिक कीर्तीचे संशोधन करून लाखोंना जीवदान देण्याचे काम केले.
याबद्दल भारत सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री हा देशाचा मनाचा किताब देऊन गौरवांकित केले आहे. दरम्यान, आज ते शहरात आले असता माँ जिजाऊ अर्बन परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड हे होते. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाभाऊ भोंडे, हभप डॉ. विकास बाहेकर, हभप भिकाजी तायडे, रणजितसिंग राजपूत, संस्था उपाध्यक्ष शिवाजी तायडे, सचिव नितीन जाधव, रामेश्वर साखरे, डॉ. शरद काळे, विलास भगत व पत्रकार गणेश निकम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात किडनी रोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. मला अनेकदा याविषयी वर्तमानपत्रात वाचायला मिळायचे. परंतु नेमके मृत्यूचे कारण काय, असा प्रश्न होताच त्यासाठी मी खारपाणपट्यात स्वता फिरलो. माती आणि पाणी परीक्षण केले. अमेरिकेच्या लॅबचेही यासाठी सहाय्य घेतले.
यासाठी लाखोंचा खर्च आला,तोही केला. परंतु स्फुरद ची मात्रा व त्यातून होणारे किडनीचे नुकसान पुढे आले. यावर संशोधन करून उपाय शोधता आले. हे प्रमाण आता ०.३० टक्क्यावर आणण्यात यश आले आहे. संशोधन कोणतेही असू द्या, त्याची सुरुवात कुटुंबातून होते. मुलांना घेऊन अभ्यास करणारे पालक खरे तर मुलांचे नुकसान करतात. त्याला त्यांचे काम करू दिले तर तो सक्षमपणे उभा राहतो, असे सांगितले.
त्यानंतर संस्था अध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड यांनी आपले विचार व्यक्त करताना पद्मश्री डॉ. बावस्करांनी लाखो लोकांचे प्राण वाचवणारे संशोधन पुढे आणले. त्यांचे हे कार्य एखाद्या प्रेषिता सारखेच असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. पद्मश्री बावस्करांचे कार्य मानव मुक्तीचे असल्याचे शिवाजी तायडे म्हणाले. हभप विकास बाहेकर, आहार तज्ञ डॉ. हिंगणे, हभप भिकाजी तायडे, यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला व्यवस्थापक मनोज तायडे, डॉ. शरद काळे, विलास भगत व कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.