आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाघजाळ येथील एकवीस वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गाव शिवारात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यादव सोळंके असे मृत युवकाचे नाव आहे.

वाघजाळ येथील मुरलीधर राजू सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ यादव राजू सोळंके (२१) याने गजानन उबाळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच नापोका राजेश हिवाळे, नापोका शिवाजी मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवला. पुढील तपास नापोका राजेश हिवाळे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...