आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील खल्याळ गव्हाण व सवडद येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी यशाला चार चाँद लावले आहेत. अडथळ्याची शर्यत पार करत लक्ष्य गाठले आणि खांद्यावर फौजदार पदाचे स्टार लावले. त्यामुळे दोन्ही गावातील गावकऱ्यांनी त्यांचा अभिमानाने सत्कार करून कौतूक केले. दरम्यान, खल्याळ गव्हाण येथील मनोहर अशोक दंदाले व सवडद येथील शविाजी तेजराव देशमुख यांनी गावातील तरूणांना प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर यश हे हमखास मिळवता येते असे सांगितले.
प्रत्येकाला अभिमान वाटावा व कडक सॅल्यूट करावा, अशा या दोन ध्येयवेड्यांची एमपीएससी परीक्षेतून पीएसआय म्हणून नविड झाली आहे. त्यांना कॉन्व्हेंटचे शिक्षण होते ना महागड्या शिकवण्या. घरात शैक्षणिक वातावरण तर दूरच; पण होती ती गरिबी... पैशांची कायमच चणचण, आई-वडील काबाडकष्ट करून संसाराचा भार पेलवत. मुलांच्या शिक्षणाचे ओझे न झेपणारेच; पण लेकरांची धडपड पाहून त्यांचा ऊर भरून येई. लेकरा, तू फक्त शिक...पैशाची काळजी करु नको... असं म्हणत जन्मदात्यांनी प्रोत्साहन दिले अन् मुलांनीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत फौजदार बनून नशीब काढले. अडथळ्यांची शर्यत पार करुन यशाला गवसणी घालणाऱ्या सिंदखेडराजा मतदार संघातील दोन भूमिपुत्रांच्या खांद्यावर खाकी वर्दीचे स्टार चमकले आणि त्यांच्या यशालाही चार चाँद लागले.
कोणताही क्लास न लावता स्वत:च अभ्यास करुन नोट्स तयार केल्या
वडील तेजराव बापूराव देशमुख हे शेतकरी असल्याने कष्टा शविाय फळ मिळत नाही याचे बाळकडू घरातूनच मिळाले. सन २०१८ मध्ये रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यादरम्यान पीएसआय व्हायचे ध्येय निश्चित केले. परीक्षेची तयारी करीत असताना स्वत:च अभ्यास करून नोट्स तयार केल्या तसेच कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही.
खचून न जाता चुकांचे आत्मपरीक्षण करून प्रवास चालू ठेवला
पदवीचे शिक्षण सुरू असताना २०१३ पासून स्पर्धा परीक्षेला बुलडाणा येथे तयारी सुरू केली. या काळात अनेक यश -अपयश पाहण्यास मिळाले. शेवटी सहा वर्षांच्या कठिण परिश्रमानंतर २०१९ मध्ये असिस्टंट इंटेलजिन्स ऑफिसर या पदावर नविड झाली. आपल्या कौटुंबिक सर्वसाधारण परिस्थितीचा बाऊ केला नाही. कोणतेही क्लास न लावता जिद्द, चिकाटी व सातत्याच्या जोरावर आपल्याला नक्कीच यश मिळवता येते. एखाद्यावेळी अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या चुकांचे आत्मपरीक्षण करून आणखी सातत्याने आपला प्रवास चालू ठेवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.