आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर अपघाताची मालिका:अज्ञात वाहनाच्या धडकेत‎ युवक गंभीर जखमी‎

अंढेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या‎ एका बत्तीस वर्षीय युवकास जबर धडक दिली. या‎ अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना‎ सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मेरा खुर्द येथील‎ अवचार यांच्या दुकानासमोर घडली.‎ काही दिवसांपूर्वीच चिखली ते देऊळगाव राजा‎ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले .‎ तेव्हापासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे.‎

आतापर्यंत या अपघातात अनेकांचे बळी गेले असून‎ कित्येकांना अपंगत्व आले आहे. अपघाताची मालिका‎ सुरू असतानाही संबंधित विभागाने गतिरोधक टाकले‎ नाहीत. त्यामुळे मेरा चौफुलीवर सतत अपघाताच्या घटना‎ घडत आहेत. दरम्यान, मेरा खुर्द येथील गजानन बाबुराव‎ मुळे वय ३२ हा युवक रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास‎ किराणा दुकानावरून घराकडे जात होता.

यावेळी रस्ता‎ ओलांडत असतानाच चिखली कडून भरधाव येणाऱ्या‎ अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. ही धडक एवढी‎ जबरदस्त होती की, या अपघातात तो दहा ते बारा फूट‎ फेकला गेला. या अपघातात डोक्याला जबर मार‎ लागल्याने गजानन मुळे गंभीर जखमी झाला. अपघात‎ घडताच अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून‎ पलायन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव‎ घेवून जखमीला चिखली येथील दवाखान्यात उपचारार्थ‎ दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे‎ त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात‎ आले आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी मेरा‎ चौफुलीवर गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी‎ ग्रामस्थ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...