आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद:युवकांचे ‘टरबूज फोडो’ ; विधानपरिषदेत पंकजा मुंढे यांना डावलल्यामुळे व्यक्त केला रोष

सिंदखेडराजा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री पंकजा मुंढे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्या गेल्याचे गृहीत धरुन जनमानसात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान देऊळगावराजा येथील भगवान बाबा चौकात युवा कार्यकर्त्यांनी ‘टरबूज फोडो’ आंदोलन करून रोष व्यक्त केला. दरम्यान या अनोख्या आंदोलनाची शहरात एकच चर्चा होती. ओबीसी, बहुजन व मागास समाजाच्या नेत्या पंकजा मुंढे यांचे नाव समोर करत ऐनवेळी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली. याला विरोध करण्यासाठी देऊळगावराजा येथील भगवान बाबा चौकात पंकजा मुंढे समर्थकांनी शनिवारी टरबूज फोडून आपला संताप व्यक्त केला, व घोषणा दिल्या. या आंदोलनात अॅड. सचिन श्रीमंत आंधळे, बबलू जायभाये, विलास नागरे, नीलेश वनवे, अमोल काकडे, शुभम खार्डे, विनोद मुंडे, पवन आघाव यांच्यासह अनेक युवकांनी सहभाग घेतला. प्रतिकात्मक आंदोलनामुळे येत्या काळातील विधान परिषद, नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या स्वपक्षीय उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...