आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारचा निषेध:इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे ‘थाली बजाओ’; सरकार विरोधी घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध

नांदुरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुका युवा सेनेच्या वतीने मोदी सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात शहरातील मुंदडा पेट्रोलपंपावर युवासेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून थाळी वाजून व सरकार विरोधी घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

इंधनाच्या किंमती दररोज वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे.तसंच, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून सर्वच स्तरावरून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. भारतात कोरोना आला असता थाळी टाळी वाजवून त्याला पळवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला होता. त्याच रीतीने आम्ही थाळी वाजून महागाई पळवण्याचा प्रयत्न केला.

याच महागाईच्या मुद्द्यावरून आता युवासेना चांगलीच आक्रमक झाली असून थाळीनांद आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करुन नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात युवा सेनेचे शहर प्रमुख अमोल डंबेलकर, उपशहर प्रमुख सोनू चोपडे, कृष्णा तेलकर, पुरुषोत्तम सोनोने, सागर वावटळीकर, मोहन चोपडे, योगेश इंगळे, गौरव घोराडे यांच्यासह असंख्य युवा सैनिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...