आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सतत होणाऱ्या इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे ‘थाली बजाओ’ आंदोलन; शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत आंदोलन

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेच्या वतीने शहरातील जयस्तंभ चौकातील पेट्रोलपंपावर मोर्चा काढून थाली बजाओ आंदोलन केले. यावेळी ग्राहकांना चॉकलेट वितरित करुन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. हे आंदोलन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दरवाढ मोठ्या प्रमाणावर केली आहे. इंधन दरवाढीने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसंच, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून सर्वच स्तरावरून मोदी सरकार व भाजपवर टीका केली जात आहे. याच महागाईच्या मुद्द्यावरून आता युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या महागाईच्या विरोधात आवाज उठवला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन युवासेनेच्यावतीने करण्यात येत आहे.

या अनुषंगाने बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड, युवानेते कुणाल गायकवाड, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड आदीच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करुन नाराजी व्यक्त केली.

यावेळी आंदोलनात युवासेनेचे आशिष जाधव, विजय जायभाये, उमेश कापुरे, मुन्ना बेडवाल, ओम सिंग राजपूत, गजानन दांदडे, शाम पवार, पप्पू गुजर, दीपक तुपकर, मोहन पराड,अनुप श्रीवास्तव, श्रीकृष्ण शिंदे, नीलेश राठोड, सचिन हिरोळे, संजय तोटे, गणेश राजस, उमेश माळी, मंगेश सावळे, दिनेश भिडे, नितीन राजपूत, जीवन उभरहांडे, देवा दांडगे, लखन जाधव, विलास गायकवाड, शुभम चवरे, गुड्डू पठाण, शुभम दांडगे, भैया शिंदे, गजानन साखरे, अजय मुठ्ठे, अमित मुळे, अश्विन म्हसेकर, अक्षय बेडवाल, मंगेश इंगळे, नंदू जाधव यांच्यासहित शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...