आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा रंगली:जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आठ भूतपूर्व अध्यक्षांचा विसर; ‘सुंदर माझे कार्यालय’साठी इमारतीत लावली विविध छायाचित्रे

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या इमारतीचे सौंदर्य व पदाधिकाऱ्यांची ओळख दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेने होऊन गेलेले जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची छायाचित्र लावली आहेत. जिल्ह्यातील काही स्थळांचे फोटोही लावले आहेत. मात्र अध्यक्षपदांचे फोटो लावताना आठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा विसर पडला आहे. १९८४ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फोटो लावताना अध्यक्षांचे मात्र १९९८ पासूनचे फोटो लावण्यात आल्यामुळे राजकीय वातावरणात मात्र चर्चा रंगत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभाराला १२ ऑगस्ट १९६२ पासून सुरुवात झाली. अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी पदालाही येथूनच सुरुवात झाली आहे. जवळपास ६० वर्षाचा इतिहास जिल्हा परिषदेला असून काँग्रेसचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेचा राहिला आहे. सध्याही काँग्रेसचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेला आहे. भाजपला फक्त तीन वर्षाचा काळ अध्यक्षपदासाठी मिळाला होता. सर्वाधिक जागा असूनही भाजप मात्र सत्तेबाहेर आहे.

अध्यक्षांचे केबिनमध्ये पूर्वी अध्यक्षांचे फोटो होते. मात्र अध्यक्षांचेच केबीन आधुनिक करताना हे फोटो काढून टाकण्यात आले होते. त्यावर दिव्य मराठी ने वृत सुध्दा प्रकाशित केले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष व बांधकाम सभापतींच्या केबिनचे आधुनिकीकरण करण्यात आले. ऐन कोविडच्या काळातच निधीची अडचण सांगत या पदाधिकाऱ्यांचे केबीन रंगीन बनवण्यात आल्यानंतर पायऱ्या चढताना मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांची ओळख व्हावे म्हणुन फोटो लावण्यात आले.

सी.ई.ओ वॉल, प्रेसिडेंट वॉल असे नामकरणही करण्यात आले. ही ओळख दाखवताना १९६२ पासूनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डावलण्यात आले. इतिहासात कुतुहल असते अन् तेच अपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...