आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा‎:जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा‎

अकाेला‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा‎ मंगळवारी हाेणार आहे. आर्थिक वर्ष‎ संपण्यासाठी १९ िदवसच शिल्लक राहिले‎ असून, ३१ मार्चपूर्वी याेजना लावण्याचे‎ आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.‎ त्यामुळे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीतर्फे‎ प्रलंबित राहिलेले विषय व ठराव मार्गी‎ लावण्यासाठी प्रयत्न सभेत करण्यात येणार‎ आहे.‎ जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज‎ सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित सभेच्या‎ विषय पत्रिकेवर एकूण सात विषयांचा‎ समावेश करण्यात आला आहे.

यात मागील‎ स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम‎ करणे, तीन वर्षावरील थकीत देय कास लेखा‎ संहिता १९६८चे कलम ४५ नुसार मान्यता‎ मिळणे, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण‎ सन २०२२-२३ अंतर्गत इतर जिल्हा रस्ते‎ विकास व मजबुतीकरण करणे अंतर्गत रस्ते‎ कामास प्रशासकीय मान्यता मिळणे,‎ अध्यक्षांना नवीन वाहन खरेदीसाठी परवानगी‎ मिळणे, देय कास मंजुरी प्रदान करणे, विदर्भ‎ सधन सिंचन कार्यक्रमाअंतर्गत कामाच्या देय‎ कास तीन वर्षाचे वर कालावधी झाल्यामुळे‎ मंजुरी प्रदान करणे व सभापती यांच्या‎ परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांना मंजुरी‎ प्रदान करणे, इत्यादी विषयांचा समावेश‎ सभेच्या नोट्समध्ये करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...