आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी:ज्ञानोबा तुकोबांची पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात; पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरानामुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ज्ञानोबा तुकोबांची पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा सुद्धा गजर करण्यात येणार आहे. पालखी सोबत २१ जून रोजी आळंदी येथून संविधान दिंडी निघाली आहे. ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन, कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करीत १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

संविधान दिंडी २४ जून पासून ते १० जुलै पर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी होवून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने, किर्तने, सप्तखंजिरी किर्तन आदी उपक्रम करणार आहे. त्याचबरोबर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये, विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून लोक संवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आषाढी पालखी दरम्यान पायी दिंडीत मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबवण्याचे नियोजन बार्टी मार्फत करण्यात आले असून दिंडीचा १० जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे.

पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर
खामगाव
विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मध्य रेल्वेने खामगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते खामगाव परतीसाठी प्रत्येकी चार फेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी जलंब खामगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर ओंकार भिसे यांनी निवेदनाद्वारे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे रेल प्रबंधक यांच्याकडे केली आहे. रेल्वेचा प्रवास हा सुखकर असल्याने रेल्वेने खामगाव येथून ४, ५, ७ व ८ जुलै रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची फेरी दुपारी ४ वाजता सोडावी व परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून ५, ६, ११ व १२ जुलै रोजी फेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या फेऱ्या सोडण्यात आल्या नाहीत.