आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी योजना:जि.प. च्या सेस फंडातील कृषी योजनांसाठी अर्ज करा ; 22 जून पर्यंत मुदत; कृषि विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषि विभागाच्या विविध योजना राबवण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी २२ जून पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून सन २०२२-२०२३ मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर पॉवर स्प्रेअर, पाच एचपी विद्युत पंप संच, रोटाव्हेटर, बीबीएफ प्लांटर, खते, बियाणे पेरणी यंत्र ४० हजार रुपयांच्या मर्यादेत पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता किंवा आधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीतील कृषि विभागामधील कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात अर्ज, तसेच आवश्यक कागदपत्रांसह गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...