आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी अदा हाेणार:आणीबाणीतील बंदीवानांच्या मानधनासाठी 1 काेटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आणीबाणीत बंदीवास भाेगलेल्या व्यक्तींच्या मानधनासाठी १ काेटी ६६ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी जिल्ह्यात ८३ जण पात्र असून, गत दाेन वर्षातील थकबाकीची रक्कम अदा हाेणार आहे.२०१४ ते २०१९ या कालावधीतील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. जुलै २०१८ मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली. जानेवारी २०१८ पासूनच त्याचा लाभ देण्यात आला. १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगवास भोगलेल्यांसाठी ही योजना होती. २०२०मध्ये ही याेजना बंद करण्यात आली. मात्र जून महनि्यात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता ही याेजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

हे आहेत पात्र : आणीबाणीच्या काळात एक महनि्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार व एक महनि्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस अडीच हजार मानधन सुरू केले. १) जिल्ह्यात १० हजार मानधन घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ५६ आहे.२) जिल्ह्यात ५ हजार मानधन मिळाऱ्यांची संख्या २७ आहे.

काेराेना काळात हाेती बंद ः सन २०२० मध्ये राज्यात काेराेना िवषाणूचा संसर्ग सुरू झाला. ही माहामारी राेखण्यासाठी सरकारचा खर्च झाला. निर्बंधांचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसला. राज्यात कर व करेत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर हाेणारे परिणाम लक्षात घेता १९७५-७७ या आणीबाणीदरम्यान शिक्षा भाेगणाऱ्या व्यक्तींचा गाैरव करण्याचे धाेरण’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी बंद करण्याचा निर्णय तत्कालीन महािवकास आघाडी सरकारने घेतला हाेता.

बातम्या आणखी आहेत...