आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंडाच्या अनुषंगाने शिवसेनेने शिवसैनिकांकडून प्रतिज्ञालेखावर पक्षप्रमुखांविषयी निष्ठा व्यक्त करून घेतल्यानंतर आता शिंदे गटासाठी जवळपास १ हजार जणांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात आजी- माजी आमदार (विधानपरिषद) ते बुथप्रमुखांपर्यंतच्या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांचा समावेश आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांना शिवसेनेतून काढले. मात्र आगामी निवडणुकीत भाजप व शिंदे गट साेबत लढण्याचे संकेत यापूर्वीच वरिष्ठ पातळीवरून दिल्याने िनवडणुकीत भाजपला स्वत:च्या हक्काच्या जागांवर पाणी साेडावे लागेल, अशी शक्यता आहे.
अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही गटबाजी कमी नाही. याचा फायदा घेत शिंदे गटाला झाला. गटात माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरिया व यांचे पूत्र आमदार विल्पव बाजाेरिया, उपशहर प्रमुख याेगेश अग्रवाल, युवा सेनेचे िजल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, माजी नगरसेवक शशीकांत चाेपडे, अश्विन नवले आदींनी प्रवेश केल्यानंतर आठवडाभर शिंदे गटासाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी माेहीम राबवली. जवळपास १ हजार प्रतिज्ञापत्र तयार केले असून, ते मुंबई येथे जाऊन गटाच्या नेत्यांकडे ते सादर केली आहेत.
त्यामुळे प्रतिज्ञापत्राचा खटाटाेप : बंडखाेरीनंतर शिवसेना,शिंदे गटात वर्चस्वासाठी चढाेओढ सुरू झाली. पक्ष, चिन्ह आणि अन्य बाबींसाठी निवडणूक आयाेगाकडे धाव घेतली. यावर ८ आॅगस्टला सुनावणी अपेक्षित आहे. तत्पूर्वी शिवसेना, शिंदे गटातून पक्ष संघटनेवर आमचीच कशी पकड आहे, पक्ष कसा आमचाच आहे, हे सांगण्यासाठी पुरावे सादर करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दाेन्ही बाजूने शिवसैनिकाकडून १०० रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत.
त्यामुळे भाजपला पेच : आगामी मनपा निवडणुकीसाठी यापूर्वी प्रभाग रचनेमध्ये ९१ जागा निश्चित झाल्या हाेत्या. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली. मात्र बुधवारी २०१७ च्या रचनेप्रमाणे सदस्य संख्या निश्चित हाेणार असल्याने १० ते १२ जागा कमी हाेण्याची शक्यता आहे.
दाेन्ही बाजूने निष्ठा-खरे काेण?
शिवसेना : माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून, मी त्यांच्याप्रती पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे, असे शिवसैनिकांनी लिहून दिले हाेते.
शिंदे गट : प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचे मुख्य नेते (अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारीणी) म्हणून करण्यात आला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारीच शिवसेना खरी आहे, असेही त्यात नमूद केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.