आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवढे हे क्रौर्य!:10 माकड, निलगाय अन् काळवीटची हत्या! संशयित आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पातूर आलेगाव वन परिक्षेत्रामध्ये बुधवारी 12 माकड आणि एक निलगाय मृताअवस्थेत आढळली, या प्राण्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयितांना शुक्रवारी (ता. 12) अटक करण्यात आली असून तीनही संशयितांना तीन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

प्राण्यांचे अवयव नेले होते कापून

अकोला जिल्हयातील पातूर तालुक्यामध्ये आलेगाव वनपरिक्षेत्र आहे. येथील एका पाणवठ्यावर बुधवारी सकाळी वनविभागच्या कर्मचाऱ्यांना गस्ती घालताना 10 माकड, 1 काळविट, 1 पक्षी आणि 1 निलगाय मृताअवस्थेत आढळून आले. शिकारीच्या दृष्टीने निलगायचे मुंडके आणि पाय कापून नेण्यात आले होते.

हे आहेत संशयित

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी शोधमोहित राबविली. यावेळी परिसरातील एका आरोपीच्या शेतामध्ये रक्ताने माखलेले हत्यार, दगड सापडले. त्यानुसार मधूकर कचरूल लथाड (वय 65), गोविंदा धानोजी सफाने (वय 60) व संतोष वसंत सफाने (वय 35) अशी संशयितांची नाव आहेत. तीन्ही संशयित नवेगाव पातूर जिल्हातील रहिवासी आहेत.

प्रकरणाच्या चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायालयात पातूर येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षकके अर्जूना, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, वनपाल दादासाहेब इंगळे, वनसंरक्षक वी. व्ही. थोरात, लखन खोकडसाठवे, बिडकर, वनमजूर जाधव, इंगळे यांनी केली.

पाणवठ्यामध्ये टाकला युरिया

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आरोपींनी वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये युरिया टाकला. यामुळे पाणवठ्यावर पाणी पिल्यानंतर काही वन्यप्राण्यांनी जीव सोडला. यावेळी निलगायचे मुंडके व डोक कापून खाण्यासाठी एका संशयितांच्या शेतावर नेण्यात आले. चौकशीमध्ये आरोपींनी शिकारीच्या दृष्टीने प्राण्यांना मारल्याची कबूली दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...