आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठ्यात वाढ!:पश्चिम विदर्भातील 10 प्रकल्प ओव्हरफ्लो; 2 प्रकल्पांमध्ये 95 टक्क्यांच्यावर जलसाठा

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील 27 मध्यम प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर दोन प्रकल्पांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील गार्गी प्रकल्प अद्यापही तहानलेला आहे.

प्रकल्पाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ

पश्चिम विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात एकूण 27 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे 765.03 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. मागील चार दिवसात पावसाने दडी मारल्याने प्रकल्पातील आवक मंदावली होती. मात्र दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. तुर्तास यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी तर बुलडाणा जिल्ह्यातील मन आणि कोराडी हे प्रकल्प 100 टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्या बरोबर लघु प्रकल्पाच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने 13 मध्यम प्रकल्पाचे तर 4 मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

गर्गा प्रकल्प ठरला अपवाद

पश्चिम विदर्भातील बहुतांश मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला असताना अमरावती जिल्ह्यातील गर्गा प्रकल्प यास अपवाद ठरला आहे. गर्गा प्रकल्पाची साठवण क्षमता 26.45 दलघमी आहे. मात्र अद्यापही या प्रकल्पाने जिवंत साठा पाहिला नाही.

प्रकल्पातील साठा असा

- 9 मोठे प्रकल्प - 1097.08 दलघमी - 27 मध्यम प्रकल्प - 573.10 दलघमी - 275 लघु प्रकल्प - 734.58 दलघमी

बातम्या आणखी आहेत...